🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान (Pakisthan) आणि न्यूझीलंड (Newzealand) यांच्यामध्ये झाला असून पाकिस्तान हा सामना जिंकून अंतिम फेरीसाठी (Final) पात्र ठरला आहे. तर, आता 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर पाकिस्तानचा सामना उपांत्य फेरीतील दुसऱ्या विजेत्याशी होईल. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली होती. एकतर्फी ठरलेल्या या सामन्यांमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवत 5 गडी राखून विजय मिळवला.
या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जेव्हा पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता होती. दरम्यान, बाबर आझम आणि टीमने संघाने हे यश खेचून आणले आहे. बाबरच्या नेतृत्वाचे त्यासाठी जगभर कौतुक देखील होत आहे. तर दुसरीकडे भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मिश्किल अंदाजामध्ये बाबरचे कौतुक केले आहे.
पाकिस्तान संघ बाबर आझमच्या नेतृत्वाखाली उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यानंतर, चाहत्यांनी बाबर आझम आणि इमरान खान यांची तुलना केली आहे. जर बाबर आझमने टी 20 विश्वचषक स्पर्धेचे ट्रॉफी पाकिस्तानात नेली तर तो भविष्यात पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ शकतो, असेही काही चाहते म्हणाले आहे. तर दुसरीकडे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही बाबरला असे संबोधले आहे.
भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर म्हणाले की, “जर पाकिस्तानने विश्वचषक जिंकला तर 2048 मध्ये बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीपूर्वी स्टार स्पोर्ट्स सोबत बोलताना सुनील गावस्कर यांनी हे विधान केलं.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) November 10, 2022
आज होणाऱ्या दुसऱ्या उपांत फेरीच्या सामन्यांमध्ये टी 20 विश्वचषकमध्ये पाकिस्तानच्या विरोधात कोणता संघ खेळणार, याचा निर्णय होणार आहे. दरम्यान, अनेकांना भारत विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना पाहण्याची इच्छा आहे. हा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- T20 World Cup | न्यूझीलंडला हरवल्यानंतर बाबर आझमने दिले टीम इंडियाला चॅलेंज, म्हणाला…
- IND vs ENG T20 WC | इंग्लंडच्या 6 षटकात 63 धावा, भारतीय गोलंदाजांची खराब अवस्था
- IND vs ENG T20 WC | काय खेळलास भावा…! हार्दिक पांड्याची आश्चर्यकारक कामगिरी
- Uddhav Thackeray । “न्यायालय बुडाखाली घेण्याचा प्रयत्न…”; उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर सडकून टीका
- Salam Venky | काजोलने शेअर केला ‘सलाम वेंकी’ चा फर्स्ट लूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
