Share

T20 World Cup | न्यूझीलंडला हरवल्यानंतर बाबर आझमने दिले टीम इंडियाला चॅलेंज, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) सामन्यामध्ये बाबर आझम ( Babar Azam) च्या नेतृत्वाखाली पाकिस्तान (Pakisthan) संघाने उपांत्य फेरी (Semi Final) मध्ये विजय मिळवून अंतिम फेरी (Final) मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये पाकिस्तानने न्युझीलँडच्या 7 गडी राखून पराभव केला. या सामान्यदरम्यान, बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. दोन्ही खेळाडूंनी या सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली. त्याचबरोबर या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरी खेळणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे.

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने टी 20 विश्वचषकाच्या रोमांचक उपांत्य फेरीमध्ये न्युझीलँड संघाचा पराभव केला. 2007 मध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकच्या अंतिम फेरीमध्ये पाकिस्तानचा भारतीय संघाशी सामना झाला होता. आता हा योगायोग पुन्हा घडून येईल असे चित्र दिसत आहे. यावेळी विजयानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आज म्हणाला की, “संघाने गेल्या 4 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. समर्थकांमुळे आम्ही ही खेळी चांगली घेऊ शकलो. त्याचबरोबर पहिल्या सहा षटकांमध्ये मी आणि रिजवानने आक्रमण खेळू खेळली.

दरम्यान, पुढे बाबर म्हणाला, ” सध्या आम्ही आमचा उपांत्य फेरीमधील विजय साजरा करत आहोत आणि फायनल मध्ये आमची गाठ कुणाशी पडेल हे समजल्यानंतर उद्या त्या सामन्याचे नियोजन सुरू करणार आहोत. विरोधी संघ अंतिम फेरीत पोहोचतात आम्ही नियोजन सुरू करणार आहोत असे बाबर आझमने स्पष्टपणे सांगितले आहे.” त्याच्या या वक्तव्याने भारतीय संघाला अंतिम फेरीपूर्वी कुठेतरी आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!