बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीने वर्चस्व निर्माण केले आहे. त्यापूर्वी मागे वळून पाहिले असता सर्वाधिक सदस्य विजयी होऊनही पक्षांतर्गत बंडखोरीमुळे चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या हातातील जिल्हा परिषदेची सत्ता भाजपकडे गेली होती. पण, चार वर्षांनंतर धनंजय मुंडेंनी झेडपी ताब्यात घेतली. त्यानंतर आता जिल्हा बँकेवरही विजय मिळविला.
चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या ६० जागांची निवडणुक झाली. त्यावेळी धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते तर पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या. त्या निवडणुकीत भाजपला केवळ २० जागा मिळाल्या. पण अल्पमतात असतानाही राजकीय समीकरणे जुळवत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीकडील जाणारी सत्ता खेचत आणत झेडपीवर वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्थेची काँग्रेसची उमेदवारी धनंजय मुंडेंनी आग्रहाने राष्ट्रवादीकडे आणली. इथेही राष्ट्रवादीचा पराभव झाला.
पण, विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच समीकरणे बदलली. परळीतून पंकजांचा पराभव झाला आणि राज्यातून भाजपची सत्ताही गेली. धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्रीपद आले. यानंतर काही दिवसांनीच झालेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीने सत्ता मिळविली आणि भाजपसोबतची बाकी चुकती केली.
आता नुकतीच जिल्हा बँकेची निवडणुक झाली. अनेक वर्षांपासून बँकेवर भाजपची सत्ता आहे. पण डावपेचांत राष्ट्रवादीने बाजी मारली. सहा जागा लढविलेल्या आघाडीला पाच जागांवर यश मिळाले. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे महिला मतदारसंघातील परळीच्या भाजप उमेदवाराचा पराभव झाला आणि इथे शिवसेनेच्या उमदेवाराचा अनपेक्षित विजय घडविणण्यातही राष्ट्रवादीला यश आले.
महत्त्वाच्या बातम्या
- अर्णब गोस्वामींला दिलासा; अटकेपूर्वी द्यावी लागणार तीन दिवस आधी नोटीस
- वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात थोडं खरं बोलायला शिका; अमृता फडणवीसांचा पुन्हा प्रहार
- ‘या’ गावात मिळणार पाच रुपयात २० लिटर पाणी !
- एन व्ही रामण्णा नवे सरन्यायाधीश ? शरद बोबडेंकडून शिफारस
- आणखीन एक बदली प्रकरण, औरंगाबादच्या निलंबित कारागृह अधीक्षकाने मागितले इच्छामरण


