Share

‘मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी…’; ओवैसींचे खुलं आव्हान

Published On: 

हैदराबाद : ‘देशात सध्या अनेक विषयांवरुन वादंग सुरु आहेत. अनेक राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप करत आहेत. देशाने आत्मनिर्भर व्हायला हवं. आपण जेवढं आत्मनिर्भर असू तेवढंच सुरक्षित असू,’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

‘भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी आरएसएसची आहे. ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे भागवत जर खरे देशभक्त असतील तर त्यांनी सर्वांसमोर येऊन मान्य करावं की, भारतात चीनी सैन्याने घुसखोरी केली आहे,’ असं खुलं आव्हान ओवैसींनी मोहन भागवत यांना दिलं आहे.

‘मोहन भागवत तुम्हाला देशातील जनतेची ही स्थिती बघवत आहे का, असा सवाल करत मोहन भागवत यांचे वक्तव्य बोगस आहे,’ असा घणाघातही ओवैसींनी केला आहे. ‘चीनी सैनिक भारतात घुसून बसले आहेत, ही वास्तविकता आहे आणि ती भागवतांना दिसत नाही. देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आहे. नोटाबंदीचे दुष्परीणाम देश अद्यापही भोगत आहेत,’ असंही ओवैसी यांनी म्हटले आहे.

‘नोटबंदीने भारतीय अर्थव्यव्यस्था उद्ध्वस्त झाली. भागवत म्हणतात की आपण चीनवर अवलंबून राहायला नको, मग देशावर नोटाबंदी कोणी लादली. देशाची अर्थव्यव्यस्था उद्ध्वस्त होण्यासाठी जबाबदार कोण ? याच उत्तर फक्त मोदी सरकार आहे,’ असं म्हणत ओवैसींनी मोदी सरकार आणि मोहन भागवत यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!