पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल ओबीसी आरक्षणासह राज्यपाल कोट्यातील १२ विधानपरिषद आमदार नियुक्त्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. राज्यपालांचे वय झाले असल्याने १२ आमदार नियुक्तीच्या पत्राचा त्यांना विसर पडला असेल, असा खोचक टोला पवारांनी लगावला होता.
यावर भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत पवारांवर निशाणा साधला होता. ‘राज्यपालांचं वय झालं आहे, त्यामुळे त्यांना विसर पडला असेल, असं पवार म्हणाले आहे. मग राज्यपालांचे वय झालं आहे तर पवारांचे वय झाले नाही का? कशाला वयाचा मुद्दा काढता, खोटं बोल पण रेटून बोल अशी शरद पवार यांची प्रवृत्ती आहे’ अशी टीका पाटील यांनी केली. तर, ‘सदस्यांची नियुक्ती करायची की नाही हा राज्यपालांचा अधिकार असल्याचे कोर्टाने देखील म्हटलं आहे,’ असं देखील चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलंहोती होतं.
आता चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. ‘गेल्या दिड वर्षापासून राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडली आहे. हे संपुर्ण महाराष्ट्र पाहत आहे. या नियुक्त्या का रखडल्या आहेत? यामध्ये राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार काही नाव राज्यपांलाकडे देतं. राष्ट्रीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ती नाव मान्य करतात. मात्र राज्यात आपली सत्ता नसल्याने केंद्र सरकार राज्यपालांना हाताशी धरुन अडवणूक करत आहे,’ असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1427539978200907778?s=20
यासोबतच,’राज्याचं हित लक्षात घेता. शरद पवार यांनी आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवर बोलतांना कदाचीत राज्यपालांना वयोमानानुसार लक्षात राहत नाही, असं वक्तव्य केलं. मात्र, यावर बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या बाजूने बोलत आणि त्यांच्या मदतीला धावून जात, शरद पवार यांच्यावर टीका केली. राज्यपाल भाजपाचे पदाधिकारी नाहीत. चंद्रकांत पाटील आपलं जितक वय आहे तितकी शरद पवार यांची संसदीय कारकीर्द आहे. हे आपण लक्षात घ्यावं. ४ दिवस दिल्लीत थांबूनही तुम्हाला अमित शाहा यांनी भेट नाकारली याबाबत तुम्ही आत्मचिंतन करावं,’ असा टोला देखील रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘आमच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता, पण या सरकारने…’
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- ‘ओबीसींना फसवण्याचं काम या सरकारमध्ये चाललंय’; फडणवीसांचा गंभीर आरोप
- भारतीय हवाई दलाची कामगिरी : अफगाणिस्तानात अडकलेले १२० भारतीय आले मायदेशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

