🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दिवला भेट देऊन तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहे. भावनगर, उना, दिव,जाफराबाद आणि महूआ या भागाची हवाई पाहणी देखील पंतप्रधान करणार असून अहमदाबाद इथं आढावा बैठक घेणार आहेत.
दरम्यान तौक्तेमध्ये गुजरातमधील २७ जणांनी जीव गमावल्याचे वृत्त आहे. गुजरातमधील किनारी भागात या वादळामुळे मोठे नुकसान झाले असून, इथले वीजेचे खांब, मोठाले वृक्ष आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय इथल्या रस्त्यांचेही नुकसान झाल्यी माहिती समोर येत आहे. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा केरळ, कर्नाटक, गुजरात, गोवा, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसला. या चक्रीवादळाच्या हाहाकारामुळे हजारो एकराहून अधिक शेती, फळबागांसह किनारपट्टी भागांतील घरांचे मोठे नुकसान झाले. या वादळात गुजरातमधील १३ तर महाराष्ट्रात शेकडोहून अधिक नागरिकांचा बळी गेला. यातच आता देशात पुन्हा एक नवे चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या वादळाचा तडाखा अंदमान निकोबार, ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांना बसू शकतो.
भारतीय हवामान विभागातील चक्रीवादळ विभागाच्या प्रमुख सुनीता देवी म्हणण्यानुसार पुढील आठवड्यात पूर्व-मध्य बंगाल उपमहासागरात कमी दबाव क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यापरिस्थितीवर हवामान विभागही नजर ठेवून आहे. तसेच या कमी दबाव क्षेत्रात वेग वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मान्सून पूर्व नियोजन! जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष लागवडीचा निर्धार
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
