Share

भारताला जिंकायचे असेल तर ‘ही’ फळी ठेवावी लागेल मजबूत ; माजी कर्णधाराचे मत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतातील कोरोना परिस्थीतीमुळे आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित झाल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला. यानंतर क्रिकेट रसिकांचे लक्ष हे जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेच्या आंतिम सामन्याकडे लागले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडला घरच्या मैदानावर पराभूत केले.  4 सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 3-1 ने जिंकली. विराट ब्रिगेडला हा फॉर्म इंग्लंडमध्येही सुरू ठेवायचा आहे. आता टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंड विरुद्ध पाच टेस्टची मालिका होणार आहे.

भारताला हा सामना जिंकायचा असल्यास फलंदाजांनी दमदार कामगिरी करणे गरजेचे आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले. तसेच इंग्लंडमध्ये हवामान सतत बदलत राहते. त्यामुळे या सामन्यात प्रत्येक सत्र खूप महत्वाचे असणार आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

न्यूझीलंडच्या तुलनेत भारताची फलंदाजांची फळी मजबूत वाटते. परंतु, त्यांनी परिस्थितीनुसार खेळ करणे गरजेचे आहे. माझ्या मते, अंतिम सामन्यात फलंदाजांची भूमिका सर्वात महत्वाची असेल. इंग्लंडमध्ये हवामान एका मिनिटात बदलू शकते. तिथे फलंदाजांची कसोटी लागेल, असे कपिल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!