🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट टीम ही कर्णधार कोहलीपेक्षा जास्त प्रशिक्षक रवी शास्त्रीं यांची आहे. असं मोठं वक्तव्य इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पनेसरने यांनी केलं आहे. याच कारण देखील त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, रवी शास्त्रींनी संघातील प्रत्येक खेळाडूला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवलं आहे. त्यांनी भारतीय संघाला एक आत्मविश्वास दिला. जिंकण्याचा मंत्र दिला, असं मॉन्टी पनेसर म्हणाले.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. या विजयासह गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला. अनुनभवी व युवा खेळाडूंना हाताशी धरत काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेने भारतीय संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
भारताने ही कामगिरी विराट कोहली शिवाय करुन दाखवली. यावेळी रवी शास्त्री यांचा मोठा वाटा राहिला. त्यांनी संघाला आत्मविश्वास दिला. तुम्ही ऑस्ट्रेलियाला पराभूत करु शकता असं म्हणत विजयी मंत्र दिला आणि भारतीय संघातल्या खेळाडूंनी खरोखर सिरीजमध्ये पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चित केलं. हे काही एखाद्या जादुपेक्षा कमी नव्हतं, असं मॉन्टी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- व्यापाऱ्याचे घर फोडून रोख, लॅपटॉप लंपास
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- अट्टल दुचाकी चोर ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- महाराष्ट्र जिंकतोय ! राज्यात आज तब्बल ३१ हजार ६७१ रुग्णांना डिस्चार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
