दिल्ली : दिल्ली येथील छत्रसाल स्टेडीअममध्ये ४ मे रोजी झालेल्या मारहाणीमध्ये खुन केल्याप्रकरणी भारताचा ऑलिम्पिक कुस्तीपटु सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली होती. अटक होण्याआधी सुशीलकुमारने अटकपुर्व जामीनासाठी दिल्ली न्यायालयात याचीका दाखल केली होती. मात्र सुशील कुमारचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला.
खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर सुशील कुमारची कारकिर्द धोक्यात आली आहे. मात्र यादरम्यान सुशील कुमारला न्यायालयाने एक दिलासा दिला आहे. एका विद्यार्थ्याने मीडीयाने सुशील कुमार विरोधात वृत्त प्रसिद्ध केले त्यामुळे सुशीलची कारकिर्द धोक्यात आली आहे. तसेच त्याची प्रतिष्ठा डागळली जात असल्याचे आरोप या याचीकेत करण्यात आले आहे. सुशीलचा खटला न्यायालयात सुरु होण्यापुर्वी संशयित सुशील कुमापचा माध्यमांनी अवाजवी प्रचार केला असे या याचीकेत म्हणणे होते.
यामुळे ऑलिम्पिक कुस्तीपटु सुशील कुमार यांच्या खटल्याची सुणावणी करण्यापासून रोखण्याची मागणी करणारी ही याचीका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य केली आहे. मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली असून,२८ मे रोजी शुक्रवारी न्यायालय या खटल्याची सुनावणी घेईल. दिल्ली शहरातील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूच्या मृत्यूच्या आरोपाखाली ऑलिम्पिक कुस्तीपटु सुशील कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अभिनेता विक्रांत मेस्सीने केलेल्या तक्रारीची अॅमेझॉननं घेतली दखल
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- व्यापाऱ्याचे घर फोडून रोख, लॅपटॉप लंपास
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- अट्टल दुचाकी चोर ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

