मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भव्यदिव्य ‘जलसा’ बंगल्याची चर्चा नेहमी होत असते. परंतु आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईमध्ये आणखी एक नवे घर खरेदी केले आहे. त्यामुळे याची देखील सध्या चर्चा होत आहे. बिग बींने खरेदी केलेले घर हे सनी लिओनीच्या घराच्या शेजारी असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वीच सनीने तिथे घर घेतले होते. आता अमिताभ बच्चन यांनी देखील त्याठिकाणी घर घेतले आहे.
बिग बींच्या घराची किंमत तब्बल ३१ कोटी रुपये आहे. अमिताभ यांनी खरेदी केलेले हे घर २७व्या आणि २८व्या मजल्यावर असून ५१८४ क्वेअर फीट आहे. तसेच त्यांना ६ गाड्या पार्किंगची जागा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी नवे घर खरेदी करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी डिसेंबर २०२० मध्ये ही नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या घराची किंमत ३१ कोटी रुपये आहे. पण एप्रिल २०२१मध्ये या घराचे रेजिस्टेशन करण्यात आला आहे. या प्रॉपर्टीसाठी अमिताभ यांनी ६२ लाख रुपये स्टॅम्प ड्यूटी भरली आहे.
अमिताभ यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेता इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या अमिताभ हे ‘गूड बाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांचा आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत ‘बह्मास्त्र’ हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच त्यांचा ‘झुंड’ हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- व्यापाऱ्याचे घर फोडून रोख, लॅपटॉप लंपास
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- अट्टल दुचाकी चोर ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- महाराष्ट्र जिंकतोय ! राज्यात आज तब्बल ३१ हजार ६७१ रुग्णांना डिस्चार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
