मुंबई : अभिनेता विक्रांत मेस्सी याने मिर्झापुरमध्ये साकारलेली बबलू पंडित ही व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरली. मात्र आता विक्रांत अॅमेझॉन प्राईमनं केलेल्या एका चूकीमुळं चर्चेत आहे. त्यानं सोशल मीडियाद्वारे अॅमेझॉनची एक चुक त्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा अनेक वेब सीरिज आहेत आणि त्या वेब सीरिजवर कोणतेही सबटायटल नाहीत. या पार्श्वभूमीवर सबटायटल देण्याची विनंती विक्रांतनं केली. “जर तुम्ही किमान विदेशी चित्रपटांसाठी तरी सबटायटल दिलेत तर तो व्हिडीओ पाहताना आणखी मजा येईल. तुमच्या या कृतीमुळं प्रेक्षकांना तो चित्रपट लवकर समजेल.” अशा आशयाचं ट्विट त्यानं केलं.
Thank you for sharing your preference. We'll share your preference as feedback with our team internally for consideration.
-Anand
— Amazon Help (@AmazonHelp) May 27, 2021
त्याच्या या ट्विटची अॅमेझॉननं देखील लगेचच दखल घेतली. व त्यावर लवकरच काम सुरु होईल असं आश्वासन दिलं आहे. विक्रांत आणि अॅमेझॉनचे हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यावर मिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशावर ब्लॅक फंगसचे संकट ; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- व्यापाऱ्याचे घर फोडून रोख, लॅपटॉप लंपास
- विनाकारण फिरणाऱ्या ५०७ जणांची तपासणी, सलग तिसऱ्या दिवशी शून्य पॉझिटिव्ह!
- अट्टल दुचाकी चोर ग्रामीण गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- महाराष्ट्र जिंकतोय ! राज्यात आज तब्बल ३१ हजार ६७१ रुग्णांना डिस्चार्ज


