Share

‘देवेंद्रजींच्या हातात काही बॉम्ब असतील तर त्यांनी ते फोडावे’, राऊतांचा फडणवीसांना खोचक सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यामध्ये काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सामने रंगत आहेत. याच पार्श्वभूमीवर मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, मी दिवाळीनंतर मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधातील पुरावे जाहीर करून बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. परंतु या वक्तव्यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना खोचक सल्ला दिला आहे.

यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की,’बॉम्ब लगेच फुटले पाहिजेत. नाहीतर ज्याच्या हातात आहेत बॉम्ब त्यांच्या हातातच ते फुटतात. त्यामुळे हातात बॉम्ब वगैरे असतील तर ते डिस्पोज करा. कोणाकडे बॉम्ब असेल असं राजकीय नेते सांगत असतील तर ते स्वत:च्या जीवाशी खेळतायत. तसेच ताबडतोब त्यांनी एक तर बॉम्ब फेकला पाहिजे किंवा तो संपवला पाहिजे. देवेंद्रजींच्या हातात काही बॉम्ब असेल तर त्यांनी फोडावा ना दिवाळी संपायची कशाला वाट पहायची,’ असे राऊत म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री ड्रग्ज आरोप प्रत्यारोप प्रकरणावर का बोलत नाहीत? असे विचारण्यात आले असता राऊत म्हणाले की,’योग्य वेळी ते बोलतील. सध्या आम्ही पुरेसे आहोत. या विषयावर बोलणं हे मुख्यमंत्र्यांच कामच नाहीय. राज्य संभाळणं त्याचं काम आहे’, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!