मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजपासून (३ मार्च) सुरु झाले आहे. भाजपने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला पहिल्याच दिवशी घेरले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीने भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
“(A Minister is in Jail & still hasn’t resigned) जे कधीही इतिहासात घडले नाही, ते महाराष्ट्रात घडते आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत, त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही वा त्यांचा राजीनामा घेतलेला नाही.आरोप साधा नाही, तर मुंबईच्या मारेकऱ्यांशी आर्थिक व्यवहार झाला आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एक मिनिटात अशा मंत्र्याला बाहेर केले असते.”, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी एक मिनिटात अशा मंत्र्याला बाहेर केले असते.
हसिना पारकरला पैसे दिले आहे.
कोण आहे हसिना पारकर?
दाऊदच्या हस्तकांशी आर्थिक व्यवहार केले आहेत.
तत्काळ राजीनामा घ्या!
(विधानसभा/मुंबई/3मार्च 2022)#MVA #resign #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 3, 2022
तसेच हसिना पारकरला या प्रकरणात पैसे दिले आहे. कोण आहे हसिना पारकर? नवाब मलिक यांनी दाऊदच्या हस्तकांशी आर्थिक व्यवहार केले आहेत.त्यामुळे त्यांचा तत्काळ राजीनामा घ्या. अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. तसेच दाऊद समर्थकाचा राजीनामा होत नाही, तोवर भाजपा गप्प बसणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान आज विधान भवनाच्या पायऱ्यावरच भाजप आमदारांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले.
महत्वाच्या बातम्या:
“…ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे”, ‘त्या’ घटनेवरून आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप
State Budget Session 2022 : मविआ नेत्यांची राज्यपालांविरोधात घोषणाबाजी
माजी भारतीय दिग्गजाच्या मते ‘हे’ दोन गोलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात घेतील सर्वाधिक बळी
१००व्या कसोटी सामन्याआधी सौरव गांगुलीने केले विराटचे कौतुक द्रविडचे उदाहरण देत म्हणाला…
- State Budget Session 2022 : विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांचे आंदोलन


