Share

औरंगाबादेतील प्रसिद्ध जातिवाचक वसाहतींची नावे बदलणार; राज्य सरकारचा निर्णय!

Published On: 

औरंगाबाद : राज्य सरकारने जातीवाचक गावांच्या नावांसह शहरे व वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकेने शहरातील ५० जातीवाचक वसाहतींची नावे काढली असून ती बदलण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी वॉर्ड अधिकार्‍यांकरवी संबंधित वसाहतीमधील नागरिकांकडून नावे मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर वसाहतींची नावे बदलण्याचा निर्णय घेतला जाईल, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले. यात शहरातील जुन्या काळापासून प्रसिद्ध भाग जसे रंगारगल्ली, कुंभारवाडा, बेगमपूरा, धोबीघाट आदींचा समावेश आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार औरंगाबाद पालिकेने शहरातील जातीवाचक नावे बदलण्याची तयारी सुरू केली आहे. पालिका आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील वसाहती व रस्त्यांची जातीवाचक नावे काढण्यासाठी उपायुक्त अपर्णा थेटे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. या संदर्भात माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले की, शहरातील जातीवाचक वसाहती व रस्त्याची नावे शोधण्यासाठी वॉर्ड अधिकार्‍यांना कळविण्यात आले होते.

त्यानुसार वॉर्ड अधिकार्‍यांनी नावे कळवली आहेत. तसेच वॉर्डातील जातीवाचक नावे बदलण्यासाठी त्या भागातील नागरिकांकडून नावे मागवली जाणार आहेत. ही नावे प्राप्त झाल्यानंतर जाहीर प्रगटनाव्दारे नावांना प्रसिध्दी दिली जाईल. त्यानंतर वसाहतींची नावे बदलण्यात येतील, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!