उस्मानाबाद : अतिवृष्टी आणि जलप्रकल्प भरल्याने नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा नदी काठच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या जमिनी सुद्धा वाहून गेल्या आहेत. यावर बोलताना पंचनाम्याचे ढोंग नको, सरसकट मदत जाहीर करा अशी प्रतिक्रिया आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. त्यांनी निलंगा तालुक्यातील गौर, शेंद, मुगाव, आनंदवाडी, निटूर शिवारातील शेती नुकसानीची पाहणी केली.
यावेळी पाटील म्हणाले की, शासन निकषानुसार ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान आणि ६५ मिली मीटरपेक्षा अधिकचा पाऊस झाल्यास पंचनामे करण्याची गरज नाही. सध्या लातूर जिल्ह्यात ५० टक्क्यापेक्षा अधिकचे नुकसान झालेले असून ९५ मिली मीटरपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे आता सरकारने पंचनाम्याचे ढोंग न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी.
शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत दिवाळीपुर्वी रब्बी पेरणीच्या अगोदर मिळणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. आता किमान रब्बीची पेरणी त्यांना करता यावी याकरीता मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या हातात पडणे गरजेचे आहे. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसह पिकविमा कंपनीनेसुद्धा ऑनलाईन अर्ज केलेले असो वा नसो शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीपोटी विमा रक्कम द्यावी. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तात्काळ मदतीची घोषणा करावी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा देखील आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- ५१ टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचा- चंद्रशेखर बावनकुळे
- औरंगाबादच्या सर्व कालव्यांची वहन क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करा, जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ मागणीचं देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत
- ‘मविआ’चे घटक पक्ष म्हणून तिन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवावी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे आवाहन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

