Share

कोणी मास्क न घालता कारण देत असेल तर पुणे पोलिसांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ दाखवाच !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

देशात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या टॉप-१० जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा अव्वल आहे. तर, टॉप-१० पैकी ८ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत. यामुळे राज्याची स्थिती गंभीर होत आहे. कोरोनाला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी व स्वतःसह कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

बोलताना व एकत्र येताना योग्य अंतर पाळले पाहिजे, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळले पाहिजे, वारंवार हात धुतले पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे मास्क घातलाच पाहिजे. मात्र, मास्क न घालता काही जण कारण देत असल्याचं वारंवार समोर येत आहे. मास्क न घालणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड देखील वसूल केला जात आहे.

अशातच, आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या व उन्हाळा देखील झपाट्याने वाढत आहे. मास्क न घालण्यास कारण देत असाल तर पुणे पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिव्यांग व्यक्ती मास्क घालताना दिसत आहे. कोणाला हात नाहीत, तर कोणाला डोळे नाहीत. मात्र तरीही ते मास्क घालत आहेत. ‘खूप गरम होतंय, मास्क नाही घालू शकत, असं जर कारण तुम्ही दिले असेल तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे,’ असा संदेश देखील पुणे पोलिसांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!