मुंबई : राज्यात आज 4,355 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 43 हजार 034 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे. राज्यात आज 119 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 49 हजार 752 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 26,32,810 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,32, 649 (12.22 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,01,955 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,330 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान केंद्र सरकारसह राज्य सरकारने यावेळी खबरदारी म्हणून तिसऱ्या लाटेआधीच तयारी सुरु केली आहे. दरम्यान आता तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारतात 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोनाची लस देण्याची योजना सरकार आखत आहे.
देशात 12 ते 17 वयोगटातील सुमारे 12 कोटी मुलं आहेत, पण सर्वात आधी गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना कोरोना लिस दिली जाणार आहे. DCGI कडून 12 वर्षे आणि त्यावरील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी मिळाली असून, Zydus Cadila ची लस Zycov-D या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना देण्याची योजना आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल – राज्यमंत्री भरणे
- ‘सख्खा भाऊ योगी, शहांबद्दल असं बोलत नाही’; राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले
- भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये गुंडाळला; ९ खेळाडू दोन आकडी संख्या न गाठताच माघारी
- कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’-यशोमती ठाकूर
- अफगाणी नागरिकांना यापुढे देश सोडून जाण्याची परवानगी देणार नाही – तालिबान


