Share

शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल – राज्यमंत्री भरणे

Published On: 

मुंबई : कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले असून शेतीला जोडव्यवसाय म्हणून चांगले उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी शेतीला मत्स्यशेतीसारख्या जोडव्यवसायाची आवश्यकता असून शेततळ्यात, विहीरीत व तलावात शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

भरणे यांच्या हस्ते ‘ॲग्रोटेक’ मासिकाच्या मत्स्यव्यवसाय विशेषांकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. याप्रसंगी मासिकाचे संपादक गणेश हाके यांच्यासह त्यांचे सहकारी उपस्थित होते.

मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्याचे राज्यशासनाचे धोरण आहे, असे सांगून राज्यमंत्री भरणे म्हणाले, व्यक्तिगत, समूह पद्धतीने मस्त्यशेती करु इच्छिणारे शेतकरी, मच्छिमार, मत्स्यव्यवसायिक यांच्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अनेक योजना आहेत. त्याशिवाय या योजनांमध्ये महिलांनाही प्राधान्य दिले जाते. पुढील काळात मत्स्यशेतीला प्राधान्य देण्यासह स्वतंत्र योजनाही राबविण्याचा शासनाचा मानस आहे. तरी या योजनांचा लाभ घेऊन सर्व संबंधित घटकांनी प्रगती साधावी. मत्स्यव्यवसायासाठी लागणारे आधुनिक तंत्रज्ञान व अर्थसहाय्य शासनाकडून दिले जाईल, असे भरणे यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!