नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून डिवचलं होतं. फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक टीकांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही फडणवीसांना डिवचण्याची संधी सोडली नाही. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विचाराचं सोनं लुटलं जायचं. पण काल त्यांना गरळ ओकताना पाहिलं. जनतेने भाजपला नाकारलं नाही. काँग्रसे राष्ट्रवादीला नाकारलं. शिवसेनेला वरपास केलं याचं त्यांना विस्मरण झालं आहे. आम्ही 70 टक्के जागा जिंकल्या. तुम्ही 45 टक्के जागा जिंकल्या. तुम्हाला जनतेने नाकारलं. हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे, असं ते म्हणाले.
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर मग सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांना मुख्यमंत्री का नाही केलं? असा सवाल करतानाच तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेना सोडून का गेली असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रिपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री, ड्रग्ज पेडलरची वकिली करणाऱ्या नवाब मलिकांचं तुम्ही समर्थन करता; भातखळकरांचा गंभीर आरोप
- ‘राज्यांच्या कारभारात केंद्राची लुडबुड नको’, मुख्यमंत्र्यांचे जाहीर आव्हान’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- प्रदीर्घ काळानंतर लवकरच’सकिनाची प्रेमकथा’;सनी देओलने केली घोषणा..!
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?


