Share

‘डीआरएसबद्दल काही सुधारणा गरजेच्या, अंपायर कॉल’चा आयसीसीने पुन्हा विचार करावा’

Published On: 

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे होत आहे. हा सामना अनेक बाबींमुळे क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला असून, त्यापैकीच एक म्हणजे डीआरएस संदर्भात झालेले विवाद. आता डीआरएस संदर्भात भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहले आहे की, डीआरएसबद्दल काही सुधारणा होणे गरजेचे आहे. सचिन म्हणतात की, ‘खेळाडू जेव्हा डीआरएस घेतो, तेव्हा तो मैदानावरील अंपायरच्या निर्णयाशी असहमत असतो. अशावेळी आयसीसीने अंपायर कॉल बद्दल आपला निर्णय बदलण्याची गरज आहे.’

जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील सुरुवातीलाच जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला असता चेंडू बर्न्सच्या पॅडला लागला. भारतीय संघाने जोरदार अपील करूनही अंपायरने बर्न्सला नाबाद घोषित केले. यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये दिसले की चेंडू स्टम्पला लागत होता. मात्र यावेळी अंपायर कॉल भारताच्या विरुद्ध असल्याने बर्न्सला पुन्हा नाबाद घोषित करण्यात आले. या प्रसंगावरून सचिनने ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!