🕒 1 min read
मुंबई : एखाद्या स्टार पेक्षा कमी नसतो तैमूर आली खानचा अंदांज, करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर सेलेब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच तैमूरच्या त्या फोटो वरती लाईक्सचा पाऊस पडतो.
बॉलिवूड कलाकारांपेक्षा त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्स सतत चर्चेत असतात. त्यात करीनाचा लाडका लेक तैमूर नेहमीच कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतो.
काही दिवसांपूर्वी तैमूर क्रिकेट तरी कधी शेती करताना दिसला तर काही दिवसांपूर्वी तैमूरने धर्मशाळा येथे मातीचे भांडे बनवले होते. त्याचे हे सगळे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अशातच तैमूर आता स्वयंपाक बनवायला शिकत आहे.
धर्मशाळा येथील हयात रीजेंसी हॉटेल यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमूरचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये खान कुटूंबीय हे हॉटेलच्या स्टाफसोबत दिसत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये तैमूरने शेफ प्रमाणे काळ्या रंगाचे अॅपरन घातले असून तो चॉकलेट एगशेल बनवताना दिसत आहे. तर करीना आणि सैफ हे त्याच्याकडे पाहत असून तैमूरला सल्ला देताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CIQOhhJHxZE/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी?ठाकरे सरकारवर दानवे बरसले
- ‘ही सरकारच्या कामांची वर्षपूर्ती नव्हे तर लोकोपयोगी कामांचे विद्यमान सरकारने घातलेले वर्षश्राद्ध’
- केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे यावर आधी एकमत करा; दरेकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

