🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या कार्यालयावर कारवाई करत तिचे कार्यालय तोडण्यात आले होते. यावरून कंगनाने न्यायालयात धाव घेतली होती. आता, मुंबई उच्च न्यायालयानं बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,’ असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. आता न्यायालयाने राज्य सरकारला देखील समज दिली आहे.
कंगना रानौतने ट्विटरद्वारे आक्षेपार्ह लिखाण करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख देखील केला होता. तर, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर असं देखील तिने संबोधलं होतं. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत देखील गेलं. ‘तुम्ही ट्विटरवरील सर्वांच्या विरोधात जाणार आहात काय? कितीजणांविरोधात खटला दाखल करणार?’ असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे.
यावरूनच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. ‘राज्य सरकार सोशल मीडियावरील किती टीकाकारांविरुद्ध खटले दाखल करणार ? दुर्लक्ष करायला शिका… अशी समज अखेर मुंबई उच्च न्यायालयाला सूडबुद्धी ठाकरे सरकारला द्यावी लागली. हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण… ‘ असा टोला त्यांनी लगावला आहे.
राज्य सरकार सोशल मीडियावरील किती टीकाकारांविरुद्ध खटले दाखल करणार ? दुर्लक्ष करायला शिका… अशी समज अखेर मुंबई उच्च न्यायालयाला सूडबुद्धी ठाकरे सरकारला द्यावी लागली. हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण… pic.twitter.com/hxUvnTCx9L
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 2, 2020
महत्वाच्या बातम्या
-
खाप पंचायतीचा शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठींबा; खट्टर सरकार पाडण्याची धमकी
-
कोरोनाची लस कधी येणार याची कल्पना नाही, पण सरकारकडून नियोजन सुरु- राजेश टोपे
-
‘अजानच्या बाबतीत बोलणाऱ्यांनी स्वतःच्या बुडाखाली काय आणि किती जळतंय हे बघावं’
-
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत बीड जिल्ह्यात झाले ‘एवढे’ मतदान
-
‘शिवसेनेनं हिंदुत्वास सोडचिट्ठी दिली असं जे म्हणतात, त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
