मुंबई : बिग बॉस (big boss 15) मधील स्पष्ट वक्तव्य आणि सतत चर्चेत असणारं नाव म्हणून स्पर्धक अभिजीत बिचुकले (Abhijit Bhichukale) सर्व परिचित आहे. नुकतच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी अनेक विषयांवर तसेच ‘सलमान खान (salman khan) स्वत: ला काय समजतो? म्हणत संताप व्यक्त केला.
दरम्यान बिग बॉस १५ च्या सिझनबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा आहे. तसेच शोमधल्या स्पर्धकांपैकी एक म्हणून अभिजीत बिचुकले यांचे एक नाव आहे. घरात होणाऱ्या वाद-विवादाच्या चर्चेत असणाऱ्या स्पर्धक बिचुकलेने बाहेर पडताच सलमान खानबद्दल एका वृत्तवाहिनीला माहिती देत म्हणाले ‘सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे’, असं म्हणत बिचुकलेंनी सलमानवरील त्याचा राग व्यक्त करतांना दिसला. तसेच तो ‘सलमान स्वतःला भाई समजतो पण त्यानेही लक्षात ठेवावं मी दादा आहे’, त्यांच्या आग्रहाखातर मी शोमध्ये राहिलो.
याचबरोबर ‘मी या शोमधून बाहेर पडणारच होतो. मला अशा शोची गरज नाहीये. मला त्यांनी थांबण्याची विनंती केली. त्यामुळे मी थांबलो. त्यांना माझी गरज होती, त्यांनी बोलावलं म्हणून मी बिग बॉसमध्ये गेलो.’म्हणत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहे,असं शोमधून बाहेर काढलं गेलं की तुम्ही बाहेर पडलात याबाबत बोलतांना बिचुकलेने असा खुलासा केला. तुम्हाला तसेच ‘हिंदी बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले होणार आहे म्हणून शांत आहे. एकदा ग्रँड फिनाले झाला की पत्रकार परिषद घेऊन मी खुलासा करेन’, असं बिचुकले म्हणाले.
बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय हे जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. अभिजीत बिचुकले हे याआधी मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. त्यावेळीही त्यांनी केलेली विधानं चर्चेत होती. त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.
सध्या ते बिगबॉस हिंदीमध्ये सहभागी झाले होते. नुकतेच ते बिगबॉसच्या घराबाहेर पडले आहेत. आता त्यांनी बिग बॉसचं घर आणि सलमान खानवर आरोप केले आहेत. बिचुकलेने केलेल्या वक्तव्यामुळे आता सोशल मीडियावर मात्र चर्चेला उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- गावगुंड नाना पटोले यांनी औरंगाबादेत येऊन दाखवावे त्यांचे कपडे फाडू; भाजपकडून पटोलेंविरोधात आंदोलन!
- सहकारी साखर कारखान्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी अण्णा हजारेंचे अमित शहांना पत्र
- “राम मंदिराच्या लढ्यात सगळ्या केसेस शिवसैनिकांनी अंगावर घेतल्या”, भाजपच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर
- शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह; पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करत म्हणाले….
- कॉमेडीयन भारती सिंहने घेतले सलमानकडून आश्वासन म्हणाली, “आमच्या बाळाला लाँच कराल का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

