Share

‘मी इतकंच सांगेन की..’, संभाजीराजेंचे नाशकात लोकप्रतिनिधींना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूक आंदोलनाची हाक दिली आहे. नाशकात आज खासदार संभाजीराजे छत्रपतींचं आंदोलन होत आहे. छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित राहणार आहेत. आंदोलनात पुढील दिशा निश्चित होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. आंदोलनानंतर राज्य समनवयकांची बैठक होणार आहे. दरम्यान, आंदोलन सुरू होण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना महत्त्वाचं आवाहन केलं.

संभाजीराजे म्हणाले, ‘समन्वयकांना आणि जे राज्यातून आलेले आहेत. जे समाजाचे घटक आहेत, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे. मी इतकंच सांगेन की, आपण जे आंदोलन पुकारलं आहे, ते मूक आंदोलन आहे. समाज बोलला आहे. आम्ही बोललो आहोत. आता लोकप्रतिनिधींनी आपलं मत व्यक्त करावं. ते काय जबाबदारी घेणार, हे सांगावं. समन्वयकांनी आणि इतरांनी उलट प्रश्न करू नये. पक्षाशी संबंधित न बोलता लोकप्रतिनिधींनी समाजाला न्याय देण्यासाठी काय करू शकता, समाजाची कोणती जबाबदारी घेणार, हे सांगावं. कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. आपली भूमिका सांगावी’.

नाशकात आज होत असलेल्या मराठा मूक आंदोलनासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. २० अधिकारी आणि १५० कर्मचारी आंदोलनस्थळी तैनात असून आंदोलनावर नजर ठेवणार आहेत. ज्या ठिकाणी आंदोलन पार पडणार आहे तिथे प्रवेशद्वारावरच बैरिकेटींग करण्यात आले असून येणाऱ्या आन्दोलकांची तपासणी केली जात आहे. आंदोलन मूक असल्यानं कोणीही घोषणाबाजी करू नये आशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. आंदोलना नंतर समन्वयक बैठक घेतली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!