नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी सकाळी देशातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदींनी कोरोना संकट काळात योग हा आशेचा किरण असल्याचं म्हटले. यासोबतच भारतानं जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) मिळून तयार केलेल्या M-Yoga App चे मोदींनी लाँचिंग केले.
यावेळी त्यांनी कोरोना संकटात योगाचं महत्व सांगितलं. योगामुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळते. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले.
LIVE: PM Shri @narendramodi's speech on 7th #InternationalDayOfYoga. https://t.co/w4EOunx0P2
— BJP (@BJP4India) June 21, 2021
‘आज जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. कोरोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,” असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
In collaboration with WHO, India has taken another important step. Now there will be M-Yoga app, which will have yoga training videos in different languages for people across the world. This will help us in our 'One World, One Health' motto.#InternationalYogaDay pic.twitter.com/SKVpeUoQt7
— ANI (@ANI) June 21, 2021
M-Yoga App च्या माध्यमातून जगभरातील लोकांना वेगवेगळ्या भाषेत योगा शिकता येणार आहे. ‘जगाला आता M-Yoga App ची ताकद मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षण योग प्रशिक्षण देणारे व्हिडिओ जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये असतील. भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सोबत मिळून एक महत्वाचे पाऊल उचलले आहे’, असे मोदींनी यावेळी म्हटले.
‘कोरोनाच्या अदृश्य व्हायरसने जगात धडक दिली तेव्हा कोणताही देश संसाधनं तसंच मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हता. अशा कठीण काळात आत्मशक्ती महत्वाचा मार्ग ठरला. मी आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलतो तेव्हा योगालाही सुरक्षा कवच केल्याचे ते सांगतात. डॉक्टरांनी स्वत: आणि रुग्णांसाठी योगाचा वापर केला. आजारातून बाहेर पडल्यानंरही योगा महत्वाचा आहे,’ असे मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्युटीसी फायनल! तिसऱ्या दिवशी न्युझीलंड २ बाद १०१
- ‘जडेजा-अश्विनची जोडी टीम इंडियासाठी ठरणार गेम चेंजर’ ; दिग्गज खेळाडूचा दावा
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ

