Share

‘जडेजा-अश्विनची जोडी टीम इंडियासाठी ठरणार गेम चेंजर’ ; दिग्गज खेळाडूचा दावा

Published On: 

इंग्लंड : जागतीक कसोटी चॅम्पियशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव संपुष्टात आला आहे. पहिल्या डावात भारताने सर्वबाद 217 धावांची मजल मारली. या सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं. या टीममध्ये आर.अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन स्पिनर्सचा समावेश केला आहे. साऊथम्पटनमध्ये सतत पाऊस होत आहे. त्याचबरोबर मैदानात गवत देखील आहे. त्यामुळे दोन स्पिनर्स खेळवण्याच्या टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मात्र, भारताचा माजी डावखुरा फिरकीपटू दिलीप दोशीने दोन फिरकीपटू खोळवण्याच्या निर्णयाला सर्मथन दिलं आहे. दिलीप दोशी यांच्या मते, या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांची भूमिका फार मोठी असणार आहे. ते म्हणाले की, ‘भारताला प्रत्येक रनसाठी संघर्ष करावा लागणार आहे. या सामन्यात जडेजा आणि अश्विनची मोठी भूमिका असेल असे मला वाटते.’

यावेळी त्यांनी रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या फलंदाजीचे देखील कौतुक केले आहे. “या कठीण वातावरणातही रोहित शर्मा, कोहली आणि रहाणे यांनी चांगली कामगिरी केली तर शुभमन गिलनेही ठसा उमटविला”, असं दोशी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!