Share

नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

Published On: 

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यंत ईडीची कस्टडी मिळाली आहे. या मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच आता नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे.

नवाब मलिक यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असल्याचे दिसत आहे. राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी मंत्रालयातील गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकंदरीतच राज्यातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलनाला सुरुवात केली आहे. अनेकांच्या हातात, सत्यमेव जयते शेवटी खोटा नवाब जेलमध्ये, भ्रष्टाचारी आघाडी सरकारचा जाहीर निषेध, असे आशयाचे फलक झळकावून भाजप कडून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. आता या प्रकरणी नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!