🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी निगडित जमीन खरेदी केल्याचा नवाब मलिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान मलिक यांच्या अटकेनंतर संपुर्ण राज्यात गृहमंत्रालाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून संपुर्ण राज्यात आंदोलन करण्यात आहेत. तर दुसरीकडे भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नवाब मलिक हे डान्सबार चालवायचे, बांगलादेशातून मुली आणायचे आणि वेश्याव्यवसाय करायचे, या प्रकरणी आपल्याकडे व्हिडीओ स्वरुपात पुरावा असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. ते आज मुंबईत आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या आरोपामुळे राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
मोहित कंबोज म्हणाले, “बांगलादेशातून मुली आणून मुंबईत वेश्याव्यवसाय आणायचं काम नवाब मलिक करत होते. अशा अनेक मुलींचे आम्ही स्टिंग ऑपरेशन केले आहेत. त्याचे व्हिडीओ आहेत आमच्याकडे. ज्यात मुलींनी कबूल केलंय की नवाब मलिक जबरदस्ती त्यांच्याकडून मुंबईत हे काम करुन घेत होते. लवकरच मी हे सगळे व्हिडीओ येणाऱ्या काळात तपास यंत्रणांना देणार आहे.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
