पुणे : अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. कर्मचा-यांचे आंदोलन तीव्र झाले तर दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. दिवाळी तोंडावर असतांना आतापर्यंत २६ एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केली आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर समाज माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले. यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’एसटी कर्मचारी मृत्यू हा महत्त्वाचा विषय आहे. एसटी कर्मचाऱ्यांचीही वकिली करायला हवी. आर्यन खानला सोडायला मोठमोठे वकील लागले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मी वकील करेल. मुख्यमंत्री एसटी कर्मचारी प्रश्नावर गंभीर आहेत.’
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’नाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे वाद मिटेल. आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही. आमच्याकडे वाद नाही. आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत, जी येतात ती मोठी येतात.’तसेच छगन भुजबळ महाविकासआघाडीचे सन्माननीय नेते, वरिष्ठ मंत्री आहेत. कधीकाळी ते शिवसैनिक होते. त्यांच्या ती रग अजूनही आहे. सुहास कांदे यांच्यातही आमदार म्हणून तशी रग आहे. दोघांनीही एकमेकांचा सन्मान राखावा. एक आमदार आहेत आणि एक पालकमंत्री आहेत. त्यासाठी आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅचदरम्यान फॅन्समध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

