Share

‘भाजपच्या नेत्यांचा तोल गेला ; सभागृहात काल जे घडले ते अत्यंत अशोभनिय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन अतिशय वादळी ठरले असल्याचे कालपासून पाहायला मिळाले. काल अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती.

यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांना सभागृहात कामकाज पाहिले आहे. कधी आम्ही सत्तेत होतो तर कधी विरोधी बाकावर होतो. सभागृहात मतभेद होत असतात. पण सभागृहात काल जे घडले ते अत्यंत अशोभनिय वर्तन भाजपचे होते’, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘काल भास्कर जाधवांच्या दालनात जो काही प्रकार घडला तो शरमेचा होता. भाजपच्या नेत्यांचा तोल गेला, आम्ही सुद्धा विरोधी पक्षात होतो तेव्हा दालनात आंदोलन केले पण असा वाद कधी घातला नाही. याआधी सुद्धा आमदारांनी गोंधळ घातला होता. यात कारवाई करण्यात आली. कालचा गोंधळ कमी होता की काय आज प्रतिविधानसभा भरवण्यात आली. त्यामुळे कालच्या गोंधळानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं’ अशी टीका देखील अजित पवार यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!