Share

विद्यार्थ्यांना मिळणार फीमध्ये तब्बल ३५ % सूट; आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांना यश

Published On: 

वडगाव मावळ : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना फीमध्ये 30 टक्के सवलत देण्याबाबत तहसीलदारांनी आयोजित केलेल्या बैठकीत सहमती झाली. या व्यतिरिक्त आमदार सुनिल शेळके यांनी 5 टक्के फीचा बोजा उचलण्याची घोषणा केल्याने या विद्यार्थ्यांना एकूण 35 टक्के फी सवलत मिळणार आहे. या निर्णयामुळे सुमारे 14 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार सुनिल शेळके, माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत राक्षे, संस्थाचालकांपैकी चंद्रकांत शेटे, गणेश भेगडे, संतोष खांडगे, प्रकाश ओसवाल, गणेश खांडगे, संदीप काकडे, शैलेश शहा, किशोर राजेश यांचेसह पालक सदस्य अरुण माने, जमीर नालबंद,निरंजन सावंत, सुबोध जाजू, अतुल चौधरी,अरुण वाघमारे, अर्चना दाभाडे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

शासनाच्या आदेशानुसार ट्यूशन फी व्यतिरिक्त अवांतर कोणतेही शुल्क शाळांना आकारता येणार नाही. तसेच नवीन फीवाढ करता येणार नाही, असे तहसीलदार बर्गे यांनी प्रारंभीच स्पष्ट केले. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद असून काही संस्थानी ऑनलाईन शिक्षण चालू ठेवलेले आहे. या पार्श्वभूमीवर काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याचा तगादा लावलेला असून फी मध्ये सवलत द्यावी. अशी मागणी पालकांकडून होत आहे. तर काही ठिकाणी पालक व संस्थाचालक यांच्या मध्ये संघर्ष निर्माण झालेला होता.

पालकांकडून चालू शैक्षणिक वर्षात फी मध्ये 50 टक्के सवलतीची जोरदार मागणी करण्यात आली होती. संस्था या निर्णयाला तयार नव्हत्या. संस्थाचालकांनी 25 टक्क्यांपेक्षा जास्त सवलत देण्यास असमर्थता व्यक्त केली. आमदार सुनिल शेळके यांनी संस्थाचालकांनी पालकांना तीस टक्के सवलत देण्याची विनंती केली. आमदार शेळके यांनी स्वतः 5% टक्के फीचा बोजा उचलण्याची घोषणा केली. अशा प्रकारे 35 टक्के सवलत पालकांना दिली जाईल, असा सामुदायिक निर्णय करण्यात आला. मावळ तालुक्यातील फी सवलतीमुळे पालकांसह विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!