मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाच्या सऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन मुळे सर्वत्र वस्तू महागल्या आहेत. या लॉकडाऊनमुळे दुकानदार देखील आपल्या मर्जीप्रमाणे वागताना दिसत आहेत. असाच किस्सा सोशल मीडियावर मराठी अभिनेते ‘संजय मोने’ यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितला आहे. त्यांची हि पोस्ट सध्या चांगली चर्चेत आली आहे.
झाले असे कि, वॉशिंग मशिनमध्ये झालेल्या बिघाडाची तक्रार करण्यासाठी मोनेंनी एका नामांकित कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला होता. मात्र ‘जो करना है करलो..’ असं उत्तर देणाऱ्या त्या व्यक्तीवर मोने चांगलेच संतापले आहेत.

काय आहे प्रकरण ?
LG कंपनीचं वॉशिंग मशीन गेल्या वर्षी जून महिन्यात विकत घेतलं.कालपासून कपडे धुवायला टाकल्यावर चक! चक!असा आवाज येतोय.म्हणून मी LG customer care ला फोन केला.warranty period मध्ये आहे असं सांगितलं.समोर आदित्य नावाचा माणूस (an executive) बोलत होता.माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर तो म्हणाला “lock down मुळे आम्ही warranty वगैरे सगळं देऊ शकत नाही.पण तुम्ही जर येणा-या माणसाचे ४७५ रु.अधिक जर काही भाग खराब झाला असेल,त्याचे पैसे द्यावे द्यावे लागतील.मग warranty ला काय अर्थ आहे?त्यावर मी त्याला सांगितलं की ग्राहक मंचाकडे तक्रार करेन त्यावर तो म्हणाला “जो करना वोह करलो.नहीँ तो lock down के बाद आदमी आयेगा.आता यावर पुढे काय करता येईल?मला त्या “आदित्य”ला धडा शिकवायचाय.lock down काही आपण नाही घोषित केला ना?आपल्या भल्या साठी तो आहे.शिवाय त्यांनी विक्री बंद केली नाहीये..ती चालूच आहे.पुढे काय करू?यावर फालतू विनोदी उत्तरं नकोत..’
महत्वाच्या बातम्या
- बोनी कपुर आणि श्रीदेवीच्या अफेयरवर अर्जुन कपुरने सोडले मौन, म्हणाला…
- ‘आज बाळासाहेब असते, तर कोकणची दुर्दशा पाहून…’; भाजपचं पुन्हा एकदा टीकास्त्र
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- रिक्षाचालकांना शासनाकडून दिले जाणार अर्थसहाय्य
- भोकरदन येथे रस्त्यावर फिरणारे पाच जण निघाले पॉझिटिव्
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

