Share

मला मुख्यमंत्री ठाकरेंची कुंडली पाहायची आहे- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज (२७ मार्च) प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच मला मुख्यमंत्री ठाकरेंची कुंडली पाहायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे, असा खोचक टोलाही पाटलांनी लगावला आहे.

यावेळी बोलत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,‘मुख्यमंत्री ठाकरे किती भाग्यवान आहेत. ना कशाचं सोयर सुतक, ना काही काम, परंतु त्यांना कुणी हलवू शकत नाही.’ तसेच सर्व आमदार काम घेऊन एकनाथ शिंदेंकडे जातात. उद्या सामनामधून माझी खिल्ली उडवली जाईल. मात्र, काळ तुम्हाला दाखवून देतील तुम्ही कुणाची खिल्ली उडवता, असा इशाराही पाटलांनी दिला.

दरम्यान, पुढे शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले की,‘अशी डायरी सापडली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही. पण मला एवढंच दिसत आहे की खूप काही तरी होणार आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!