Share

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जाणार नाही- आदित्य ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जाणार नाही, असेही आदित्य यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात एका कार्यक्रमात बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,‘असे चित्रपट करमुक्त करण्याची गरज नाही, कारण लोक स्वतः पैसे खर्च करून हा चित्रपट पाहत आहेत. कोणताही चित्रपट बनवण्याचा अधिकार निर्मात्यांना आहे आणि त्याचा वापर ते करताय.’ तसेच या चित्रपटाच्या कमाईतून कश्मिरी पंडितांच्या भविष्यासाठी काही चांगले होणार असेल, तर नक्की प्रत्येकजण त्यात हातभार लावेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, देशभरात ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच हा सिनेमा म्हणजे काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!