Share

माझ्या जिल्ह्याची ‘ही’ ओळख पुसून काढायची आहे – विजय वडेट्टीवार

Published On: 

🕒 1 min read

गडचिरोली: ‘लडकी हू, लड सक्ती हू’ या अभियानांतर्गत कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) १४ डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात माहिती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सुरू असलेल्या तयारींचा आढावा घेतला. महिलांच्या मजबुतीसाठी आणि त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात सातत्याने प्रियांका गांधी रस्त्यावर उतरून काम करत असतात. त्या अनुषंगाने आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील महिला आणि युवतीसोबत त्या संवाद साधणार आहेत.

या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या दिशेने पाऊले टाकत शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी सीएसआर निधीतून गडचिरोली जिल्ह्यातील व ब्रम्हपुरी मतदारसंघातील मुलींना इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यासाठी प्रयत्न सुरु केले व तिच्या प्रयत्नांना यश आले असून आगामी १४ डिसेंबर २०२१ ला कॉंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील १०,००० व ब्रम्हपुरी मतदारसंघातील ५००० या प्रकारे १५,००० मुलींना इलेक्ट्रिक सायकलचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

त्याच सोबत मागासलेला, नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख गडचिरोली जिल्ह्याची देशात निर्माण करण्यात आली आहे. ही ओळख आता सर्वांच्या साथीने पुसून काढायची आहे. जिल्ह्याला विकासाची झेप घ्यायची असेल तर महिला सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण ही मोठी पायरी जिल्ह्याला चढावी लागेल, असं देखील विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!