मुंबई : राज्यसभेतील निलंबीत खासदारांचे संसदेसमोर धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांसाठी खूर्ची उचलून आणली. हा फोटो शेअर करत भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट केले आहे. ‘पवार साहेबांनी नेमला शिवसेनेचा नवीन कामगार प्रमुख’, असा टोला निलेश राणेंनी (Nilesh Rane) संजय राऊतांना लगावला आहे.
राज्यसभेतील १२ खासदारांचे संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्या विरोधात हे खासदार संसदेच्या आवारात महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सपा खासदार जया बच्चन यांनी काल १२ निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली.
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, माजी केंद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते. खासदारांनी निलंबन मागे घ्यावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यांनी माफी मागितल्याशिवाय निलंबनाची कारवाई रद्द होणार नसल्याची भूमिका राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे. निलंबित खासदार दररोज सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत संसदेच्या आवारात धरणे आंदोलन करत आहेत. विविध पक्षांच्या खासदारांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजकारण करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे लचके तोडत आहेत; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक प्रतिक्रिया
- ‘नागालँड प्रकरणाची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ कधी होणार?’, खा. राऊतांचा सवाल
- ‘गुप्तचर यंत्रणेच्या चुकीच्या माहितीमुळेच नागालँडमधील अमानुष प्रकार घडला’
- ईडी चौकशीनंतर राज्यमंत्री तनपुरेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
- ठाकरे सरकार अडचणीत; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

