उत्तर प्रदेश : समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव(Akhilesh Yadav) यांनी नुकतीच राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यासोबत एकत्रित सभा घेतली. यावेळी दोन्ही पक्षांनी युती जाहीर केली. सभेदरम्यान अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ट्वीट करत त्यांनी पंतप्रधान(Narendra Modi) मोदींच्या ‘लाल टोपी’ वक्तव्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
गोरखपूर येथेयेथील विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यानंतर सभेत पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला लक्ष्य केलं. लाल टोपी कोणाची आहे? हे उत्तर प्रदेशातील नागरिकांना माहीत आहे असा उल्लेख पंतप्रधानांनी करत, या पक्षाच्या व्यक्ती घोटाळे करतात, जमीन हडप करतात इतकेच काय दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवितात, असा आरोप केला. यावरच अखिलेश यादव यांनी मोदींना सडेतोड उत्तर देणारे ट्वीट केले आहे.
भाजपा के लिए ‘रेड एलर्ट’ है महंगाई का; बेरोज़गारी-बेकारी का; किसान-मज़दूर की बदहाली का; हाथरस, लखीमपुर, महिला व युवा उत्पीड़न का; बर्बाद शिक्षा, व्यापार व स्वास्थ्य का और ‘लाल टोपी’ का क्योंकि वो ही इस बार भाजपा को सत्ता से बाहर करेगी।
लाल का इंक़लाब होगा
बाइस में बदलाव होगा! pic.twitter.com/NPDAGzzjIi— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) December 7, 2021
‘भाजपासाठी रेड अलर्ट आहे महागाईचा, बेरोजगारीचा, शेतकरी-मजुरांच्या परिस्थितीचा, हाथरस, लखीमूपर, महिला आणि तरुणांच्या छळाचा, व्यापार आणि आरोग्य सेवांचा आणि ‘लाल टोपी’चा. कारण तेच भाजपाला सत्तेबाहेर करणार आहेत. यावेळी त्यांना ‘लाल का इंकलाब होगा, बाइस में बदलाव होगा’ असा इशारा देणारे ट्वीट करत अखिलेश यादव यांनी मोदींना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राजकारण करण्यासाठी ओबीसी आरक्षणाचे लचके तोडत आहेत; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक प्रतिक्रिया
- ‘नागालँड प्रकरणाची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ कधी होणार?’, खा. राऊतांचा सवाल
- ‘गुप्तचर यंत्रणेच्या चुकीच्या माहितीमुळेच नागालँडमधील अमानुष प्रकार घडला’
- ईडी चौकशीनंतर राज्यमंत्री तनपुरेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
- ठाकरे सरकार अडचणीत; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून चौकशी


