Share

पूर्वी टाईमपास साठी ‘चला हवा येऊ द्या’ पाहायचो, आता मुलाखती पाहतो; भाजपा आमदाराची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपासोबत असलेला महायुतीचा संसार मोडत शिवसेनेने विरोधी पक्ष समजल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचे राज्यात सरकार स्थापन केले आणि त्यामुळे सर्वाधिक १०५ आमदार असलेल्या भाजपाला विरोधी पक्षावर बसावे लागले. यानंतर हे सरकार वेगवेगळी विचारधारा असलेल्या पक्षांचे असल्याने फार काळ टिकणार नाही अशी टीका केली जात असताना, महाविकास आघाडीतील नेते भाजपाला हे ५ वर्षेचं काय तर अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागणार असे प्रत्युत्तर देण्यात येत होते.

दरम्यान, सामनातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत खासदार संजय राऊत यांनी घेतली होती. या मुलाखतींमध्ये अनेक खळबळजनक सत्य समोर येणार असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात येत होते. तर, या मुलाखतींमध्ये काहीही खळबळजनक नसून अनेक टीका भाजपातर्फे करण्यात आल्या होत्या.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जाणार शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर!

दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी देखील एका खाजगी वृत्तवहिनीला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीमध्ये त्यांनी देखील अनेक वेगवेगळे दावे केले. तर या कोरोना व्हायरस व रोगांबाबत जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) तरी काय कळतंय, असे विधान देखील केले. त्यामुळे अनेकांनी या विधानासह मुलाखतीची  खिल्ली उडवलेली पाहायला मिळत आहे.

#पुणे_अलर्ट : खडकवासला धरणातील विसर्ग आज सकाळपासून आहे तब्बल ‘इतका’!

यातच, आता भाजपाचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील एक ट्विट करत अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.” पूर्वी वेळ मिळाला तर टाईमपास साठी ‘चला हवा येऊ द्या’ पाहायचो… सध्या मुलाखती पाहतो “, असे ट्विट करत या मुलाखतींच्या सत्रावरच खिल्ली उडवत टीका केली आहे. आता, यावर शिवसेना काय उत्तर देणार हे देखील महत्वाचं आहे. अतुल भातखळकर यांनी याआधी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उभे केल्याचे पाहायला मिळाले होते.

#व्यक्तिविशेष : महेंद्रसिंग धोनी! तो आला, त्याने पाहिलं, तो लढला, त्याने जिंकून घेतलं सारं…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!