Share

#पुणे_अलर्ट : खडकवासला धरणातील विसर्ग आज सकाळपासून आहे तब्बल ‘इतका’!

Published On: 

पुणे : ४ दिवसांपूर्वी खडकवासला धरण १०० टक्के भरल्यानंतर या मौसमतील पहिला विसर्ग मुठा नदीमध्ये सुरु करण्यात आला होता. यानंतरही गेल्या ३ दिवसात शहरासह धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत होणारा विसर्ग वाढवण्यात आला. नदी परिसरासह आजुबाजुच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला, तसेच नदी पात्रात लावलेली वाहने इतरत्र हलवण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.

काल, बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला होता तर काल ‘खडकवासल्या’तून सायं ७:३० पासून १६ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात येत होता. यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने आता खडकवासला धरणातून करण्यात येणारा विसर्ग आता ९ हजार ३५० क्युसेक वेगापर्यंत करण्यात आला आहे. तसेच, खडकवासला धरण साखळीतील इतर धरणांमध्ये देखील पावसाच्या सलग हजेरीमुळे चांगली वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट द्वारे चालू विसर्गाची माहिती दिली आहे.

#व्यक्तिविशेष : महेंद्रसिंग धोनी! तो आला, त्याने पाहिलं, तो लढला, त्याने जिंकून घेतलं सारं…

” खडकवासला धरणातून ९ हजार ३५० क्युसेक वेगाने विसर्ग ! खडकवासला धरणातून काल सायंकाळी साडे सातपासून १६ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आलेला विसर्ग आता ९ हजार ३५० क्युसेकपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. पावसाच्या कमी-अधिक प्रमाणावर दिवभरात विसर्ग वेगात बदल होत राहतील.”, अशी माहिती मोहोळ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

पंतप्रधान मोदी वगळता सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास; राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा घणाघात

पुणे महानगरपालिकेचे आपत्ती विभाग देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव व टेमघर हि धरणे देखील लवकरच भरतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सद्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा असून एकूण ८२.२३ टक्के पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे.

स्वातंत्र्य दिनी देखील राज्यातील कोरोना आकडा गेला दहा हजार पार, तर कोरोनामुक्तांची संख्या घटली!

खडकवासला साखळी धरण पाणीसाठा (१६ ऑगस्ट, स. ६ पर्यंत)

खडकवासला : १.९७ टीएमसी/१०० %

पानशेत : ९.८२ टीएमसी/९२.१९%

वरसगाव : ९.९६ टीएमसी/७७.७८%

टेमघर : २.३४ टीएमसी/ ६२.७५%

एकूण : २३.९७ टीएमसी/८२.२३% (गेल्या वर्षी, आज : २९.१५ टीएमसी/१०० %)

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!