Share

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जाणार शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर!

Published On: 

पुणे : राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. काल पुणे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कौन्सिल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या सह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थित होते.

तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सबंध भारतासाठी ऊर्जास्रोत असलेल्या शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ल्यावर आज सकाळी भेट देणार आहेत. तर, तब्बल २० वर्षांनी पहिल्यांदाच राज्याचे राज्यपाल हे शिवनेरी किल्ल्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रथम ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतील, यानंतर संपूर्ण गडाची पाहणी देखील ते करतील असे सांगितले जात आहे.

#पुणे_अलर्ट : खडकवासला धरणातील विसर्ग आज सकाळपासून आहे तब्बल ‘इतका’!

सकाळी साडेदहा वाजता किल्ले शिवनेरीच्या पाहिल्या दरवाजापासून ते संपूर्ण गडावर पायी पाहणी करणार असून ३ तासांचा वेळ यासाठी राखीव ठेवल्याचे समजते. आज सकाळी ८ वाजता राज्यपाल हे जुन्नरकडे रवाना होणार होते. तर, गेल्या २ दशकांनी पहिल्यांदाच राज्यपाल हे जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्याला भेट देणार असल्याने जुन्नरसह तमाम शिवभक्तांसाठी हि विशेष बाब आहे.

#पुणे_अलर्ट : खडकवासला धरणातील विसर्ग आज सकाळपासून आहे तब्बल ‘इतका’!

पावसाचा हंगाम असल्याने व राज्यातील मान्सून सद्या सक्रिय असल्याने या दौऱ्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात आली असून किल्ल्यावर व मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. न्यूज १८ लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पंतप्रधान मोदी वगळता सर्वांना भारतीय सैन्याच्या क्षमतेवर विश्वास; राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा घणाघात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!