मुंबई : सोशल मीडियावर सगळेच कलाकार सक्रिय असतात. नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असतात. परंतु अशा वेळेस कधी कधी कलाकारांना ट्रॉलर्सचा सामना करावा लागतो. अनेकदा या ट्रॉलर्सला कलाकार सडेतोड उत्तर देताना दिसतात. असेच काहीसे अभिनेत्री तेजस्वीनी पंडितसोबत घडले आहे. पण ती तेजस्वीनी देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे.
नुकताच तेजस्वीनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा वनपिस परिधान केला असून ती बेडवर बसली आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘A Chameleon Soul’ असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काहींनी या फोटोवरती लाईक्सचा पाऊस पडला तर काहींनी तिला ट्रोल केले.
https://www.instagram.com/p/CL9NuR3FYWp/?utm_source=ig_web_copy_link
एका ट्रोलरने कमेंट करत तेजस्वीनीला ट्रोल केले आहे. त्याने कमेंट करत ‘जेव्हा पुरस्कारांची वेळ येते तेव्हा सोबर फोटो टाकायचे आणि बाकीच्या वेळेस हे असे…’ असे म्हटले आहे. ही कमेंट पाहून तेजस्वीनी देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलरला सडेतोड उत्तर दिले आहे. ‘बाकी वेळेस हे असे म्हणजे कसे? आणि मी अभिनेत्री आहे… दोन्ही दिसू शकते नाही का? सोबर पण आणि तुमच्या भाषेतील अशी पण’ असे तेजस्वीनीने कमेंटमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ही आजपर्यंतची सर्वात कठीण टेस्ट सीरिज; बेन स्टोक्सचं मोठ विधान
- ५० वर्ष अनिलभय्यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला होता, त्यांच्या मुलाच्या विरोधात उमेदवार नको; भाजप नेत्याची मागणी
- अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत
- ‘या अल्लाह, आमच्या PSLला कुणाची नजर लागली’ ; ‘या’ ट्विटनंतर भारतीयांनी घेतली शाळा
- रिलायन्स कर्मचाऱ्यांना खुशखबर ! कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफात लस…


