Share

अखेर कावासाकी निंजा 300 ही बाईक लाँच !जाणून घ्या किंमत

Published On: 

मुंबई : सध्या कोरोना काळात मंदावलेला वाहन उद्योगाने जोर धरला आहे. तर आता प्रदूषण आणि वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांकडे काल वाढला आहे. तर प्रदूषण टाळण्यासाठी सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देखील देत आहे.

यामध्ये कोरोना या साथीच्या आजारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. याकाळात अनेक नवनवीन वाहनांचे लाँचिंग पुढे ढकलले होते. यामध्ये कावासाकी निंजा 300 या दुचाकीचे लाँचिंग देखील लांबले होते. दरम्यान आता ही बाईक लाँच करण्यात आली आहे. कंपनीकडून या बाईकच्या डिझाईन आणि पॉवरट्रेनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत

2019 मध्ये प्रदूषणाच्या कारणामुळे देशात बीएस 4 बाईक बंद करण्यात आल्यानंतर निंजा 300 बीएस 4 बाईक बंद करण्यात आली होती. त्यांनंतर 2020 मध्ये बीएस 6 मॉडेल आम्ही बाजारात आणू असे कंपनीने जाहीर केले होते. 2020 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत ही बाईक लाँच केली जाणार होती. त्यानंतर आता अखेर निंजा 300 (Ninja 300) ही बाईक बीएस 6 सह (BS6) भारतात लाँच केली आहे. या बाईकची किंमत 3.18 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. कावासाकी निंजा 300 ही कंपनीची आत्तापर्यंत सर्वाधिक पसंती मिळालेली बाईक आहे. जुन्या बीएस 4 मॉडेलच्या तुलनेत या बाईकच्या किंमतीत 20 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कावासाकी निंजा 300 बीएस 6 ही बाईक 296 cc पॅरलल ट्विन, लिक्विड कूल्ड इंजिनसह सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये आपल्याला 38.4 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क मिळेल. यामधील मोटर 6-स्पीड गिअरबॉक्ससह लॉन्च करण्यात आली आहे ज्यामध्ये आपल्याला एक असिस्ट आणि स्लीपर क्लच देखील मिळेल.

याच वाहनात कंपनीकडून जुन्या मॉडेलप्रमाणे हार्डवेअर देण्यात आले आहे. बाईकच्या पुढील भागात 37mm टेलीस्कोपिक फोर्क आहे, तर मागील भाग मोनोशॉकसह आहे. दुचाकीमध्ये डुअल चॅनल एबीएस उपलब्ध आहे. तसेच कंपनीकडून सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर कन्सोल दिले गेले आहे. बाईकमध्ये 17 इंचाचे व्हील्स आहेत. कावासाकी निंजा 300 या बाईकची किंमत बीएस 6 व्हर्जनच्या मानाने अधिक आहे. या इंजिनाच्या श्रेणीमध्ये तुम्हाला सिलिंडर टीव्हीएस अपाचे RR 310 आणि केटीएम आरसी 390 देखील मिळेल. निंजा 300 या बाईकची कावासाकीच्या 29 डिलरशिपच्या मदतीने विक्री होईल. ही बाईक तुम्हाला तीन रंगांमध्ये मिळेल. ज्यामध्ये लाइम ग्रीन, कँडी लाइम ग्रीन आणि Ebony या रंगांचा समावेश आहे. निंजा 300 स्पोर्ट्सची रचना इतकी आकर्षक आहे की आजही ही बाईक इतर अनेक वाहनांना मागे टाकू शकते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!