अहमदाबाद : अहमदाबाद येथे पार पडलेल्या डे-नाईट कसोटीत इंग्लंडच्या संघाला दोन दिवसांच्या आतच पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी या पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले. मात्र गुरुवारपासून अहमदाबादमध्येच सुरू झालेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 205 धावांमध्येच आटोपला. अहमदाबादमधील ठणठणीत खेळपट्टीवर जो रूटचा संघ गडगडला.
यानंतर आता अर्धशतकीय खेळी केलेल्या स्टोक्सने या मालिकेबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. संघाचे मुख्य फलंदाज गारद झाल्यानंतर, स्टोक्सने संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. परंतु त्याला मोठी आकडी खेळी खेळण्यास अपयश आले. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर तो म्हणाला, ‘मी आतापर्यंत ७० च्या आसपास कसोटी सामने खेळलो आहे. यादरम्यान एक फलंदाज मी पूर्ण जगात खेळलो आहे. पण एक फलंदाज म्हणून मी इतक्या कठीण परिस्थितीत कधीच खेळलो नाही. मी खूप दुखी आहे की, चांगली सुरुवात मिळाली असतानाही मी बाद झालो. अर्धशतक म्हणजे खूप जास्त धावा नसतात, अर्धशतक तुम्हाला कसोटी सामन्यात विजय मिळवून देऊ शकत नाही’
पुढे स्टोक्सने म्हटले, ‘मी खूप दु:खी आहे. मी त्या खेळपट्टीवर चेंडू सहजरीत्या खेळून काढत होतो. परंतु शेवटी मी अशाप्रकारे बाद झालो. अडीच तास खेळपट्टीवर टिकून राहिलो आणि एवढे कठीण चेंडू खेळून काढले, नंतर त्याच चेंडूवर बाद झालो. यामुळे मी खूप दु:खी आहे.’
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- कोरोनाचा धोका वाढला : औरंगाबादेत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या तिनशेपार
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन

