इसलामाबाद : नुकताच पाकिस्तानमधील टी२० लीग, पाकिस्तान सुपर लीग २०२१ ला मोठा झटका बसला आहे. या लीगमध्ये सहभागी झालेले तब्बल ७ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करावा लागला.
पीएसएलमध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या ३ दिवसांत सपोर्ट स्टाफमधील एका कर्मचाऱ्यासह ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर गुरुवारी (०४ मार्च) अजून ३ खेळाडूंचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. ६ खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफमधील १ सदस्य असे मिळून एकूण ७ जण मागील ४ दिवसात कोरोना संक्रमित झाल्याने पीएसएलच्या आयोजन समिती आणि फ्रँचायझींच्या मालकांची गुरुवारी बैठक भरवण्यात आली. या बैठकित उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला.
त्यात पाकिस्तानचा खेळाडू व PSLमध्ये इस्लामाबाद यूनायडेट खेळणाऱ्या शादाब खान आणि हसन अली यांनी केलेल्या ट्विटनंतर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन ट्रोल होऊ लागला. भारतीयांनी तर पाकिस्तानच्या खेळाडूंची चांगलीच फिरकी घेतली. शादाबनं ट्विट केलं की, या अल्लाह, हमारे पिएसएल को किसकी नजर लगा दी. हसन अली यानं ट्विट केलं की, नजर लग गई हमारी PSL को. त्यानंरत भारतीय
नेटिझन्सनी शादाब खानचा सोशल मीडियावर चांगलाचाच क्लास लावला.
Ya Allah humary psl ko kis ke nazar laga de ????????????
— Shadab Khan (@76Shadabkhan) March 4, 2021
https://twitter.com/NotBinLadeen/status/1367407159466733599?s=20
https://twitter.com/MemesSwadesi/status/1367413641503379460?s=20
https://twitter.com/MemesSwadesi/status/1367422930401959940?s=20
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- कोरोनाचा धोका वाढला : औरंगाबादेत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या तिनशेपार
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन

