पाटणा : केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचं 8 ऑक्टोबर संध्याकाळी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर 8 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, पासवान यांच्या निधनानंतर आता पक्षांची सर्व सूत्र त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे आली आहेत. दरम्यान, आता जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चाने पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, चिराग पासवान यांच्याबद्दल अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेले आहेत.
रामविलास पासवान यांच्याशी संबंधित कोणती गुपिते लपवली जात आहेत हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे हिंदुस्थान अवाम मोर्चाचे दानिश रिझवान यांनी विचारले आहे. रामविलास पासवान यांच्या मृत्यूसंदर्भात असे अनेक प्रश्न आहेत ज्यांद्वारे चिराग पासवान यांच्याकडे संशयाची सुई जाते, असे रिझवान यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री असलेले रामविलास पासवान हे रुग्णालयात उपचार घेत असताना कोणाच्या सांगण्यावरून रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन जारी केले नाही, असा सवाल दानिश रिझवान यांनी विचारला आहे.कुणाच्या सांगण्यावरून रुग्णालय प्रशासनाने उपचार घेत असलेल्या रामविलास पासवान यांना रुग्णालयात केवळ तीन जणांनाच भेटण्याची परवानगी दिली होती? याशिवाय अनेक असे प्रश्न आहेत की ज्याचे उत्तर रामविलास पासवान यांच्या समर्थकांसह त्यांच्या नातलगांना जाणून घ्यायचे आहेत. ज्याची चौकशा आवश्यक आहे असे देखील सांगण्यात आले आहे.
आता चिराग पासवान यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या मुलाबद्दल जे लोक अशाप्रकारची विधानं करताहेत, त्यांना स्वतःची लाज वाटायला हवी. मी मांझी यांना फोनद्वारे माझ्या वडिलांच्या गंभीर प्रकृतीबाबत माहिती दिली होती. मात्र तरी देखील ते माझ्या वडिलांना पाहण्यासाठी आले नाही. आता ज्या प्रकारे मांझी माझ्या वडिलांबद्दल बोलत आहेत. रुग्णालयात असताना त्यांनी इतकी काळजी का नाही दाखवली? प्रत्येकजण आता मृत व्यक्तीवरून राजकारण करत आहे. ते जिवंत असताना त्यांची भेट घेण्यासाठी का कोणी कष्ट घेतले नाहीत? असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला !
- रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी,चिराग पासवान यांच्या भूमिकेबद्दल संशय
- जाणून घ्या देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने का होतेय घट?
- भ्रष्टाचारी एकनाथ खडसेंना आमदार करू नका; दमानिया यांनी घेतली थेट राज्यपालांची भेट
- दिवाळीनिमित्त जनतेला मदत मिळावी ; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

