मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबतच्या माहितीच्या निमित्ताने एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अनिल परब यांच्या सीआरझेड झोनमधील रिसॉर्टची माहिती ही शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे आमदार रामदास कदम यांनीच पुरवल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. अनिल परब यांना अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी मटेरियल पुरविल्याचा दावा केला जातोय.
या दाव्याची पुष्टी करण्यासाठी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत माहिती मिळवली. तसेच नंतर ती किरीट सोमय्या यांना पुरवली गेली असा गंभीर आरोप केलाय.
रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तिच्या तीन कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यात. या तिन्ही क्लिपमधून रामदास कदम यांनीच सोमय्या यांना परब विरोधातील दारुगोळा पुरावल्याचं दिसून येत आहे. पण रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप फेक असल्याचे सांगत या संभाषणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे म्हटले आहे. तसेच हा आपल्या बदनामीचा कट असल्याचे ते म्हणालेत.
मनसेच्या वैभव खेडेकरांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. त्यात कोणतंही तथ्य नाही, असं म्हणत कदमांनी आरोप फेटाळून लावले. माझ्या मुलाविरुद्ध विधानसभा निवडणुकीत संजय कदम पराभूत झाले. तेव्हापासून ते सातत्यानं माझ्यावर आरोप करत आहेत. वैभव खेडेकरांच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं मी बाहेर काढली. त्यामुळे माझी बदनामी करण्यासाठी ते असे आरोप करतात. मी आधीच त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे आणि आता पुन्हा मानहानीचा दावा करणार आहे, असं कदम म्हणाले.
तुळजाभवानीची शप्पथ घेऊन सांगतो, मी सोमय्यांशी संपर्क साधलेला नाही. जो माणूस माझ्या पक्षाच्या मुळावर उठलाय, त्याला पत्रकार परिषदेनंतर मला भेटायला घेऊन ये असं मी का बरं म्हणेन, असा सवाल रामदास कदमांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री ठाकरेंच्या शिर्डीत नवं शहर वसवण्याच्या घोषणेवर गडकरींची प्रतिक्रिया; म्हणाले…
- ‘धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबद्दल ‘ते’ वक्तव्य करायला नको होते’, आ.सुरेश धसांची टीका
- फडणवीसांचा मराठवाडा दौरा अन् पंकजा मुंडेंची तब्येत बिघडली; राजकीय चर्चांना उधाण
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली, काही दिवस करणार आराम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

