🕒 1 min read
मुंबई :मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. मात्र ती एक उत्तम अभिनेत्री सोबतच एक उत्तम व्यक्ती देखील आहे. पूजा अनेकदा प्राणी आणि पक्ष्यांसोबत वेळ घालवते आणि त्यांचा मनापासून सांभाळ देखील करते. तसे प्राणी आणि पक्ष्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा ती सोशल मिडीयावर शेअर करते.
नुकताच पूजाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहेत. या व्हिडीओमध्ये दोन छोटे सुंदर असे काळ्या रंगाच्या पक्ष्याचे पिल्लू दिसून येत आहेत. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओचं चाहते आणि सेलेब्रिटी तिचे कौतुक करत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावेनं देखील कमेंट्स करत पूजाचं कौतुक केलं आहे. सध्या या तिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
https://www.instagram.com/tv/CRGIiIUF5Mh/?utm_source=ig_embed&ig_rid=23b1979b-ed1d-4c35-b6dd-b42e406a37b0
पूजा सावंतने मराठीतील ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून पदार्पण सिने इंडस्ट्रीत पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेमुळे तिचे भरपूर कौतुक करण्यात आले. त्यानंतर ती ‘लपाछपी’ या सिनेमात देखील पाहायला मिळाली. या सिनेमात पूजा सावंतसह विक्रम गायकवाड, उषा नाईक आणि अनिल गवस हे मुख्य भूमिकेत दिसले. शिवाय तिने हिंदीमध्ये पदार्पण करत अभिनेता विद्युत जामवालसोबत देखील काम केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाविरुद्धच्या ‘त्या’ वक्तव्यावर रणतुंगाला डिसील्वाकडुन घरचा आहेर
- कोरोनामुक्त गावातील शाळा सोमवारपासून सुरू करा;पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना
- कोरोना प्रादुर्भावामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत घेण्यात आला ‘हा’ निर्णय
- राज्यात आज 10,458 रुग्णांना डिस्चार्ज, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच -अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

