🕒 1 min read
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यामधील आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यात ‘दैनिक सामना’ मधील लिखानातून भाजपच्या नेत्यांना कायमचं लक्ष केले जात आहे. त्याला भाजपच्या वतीने प्रत्युत्तरही देण्यात येते. मात्र, आता शिवसेनेचे मुखपत्र हे केवळ भाजपच्या नावाने शिमगा करणारी पत्रावळ झाली असल्याची टीका भाजपच्या वतीने करण्यात आलीय.
या संदर्भात भाजपचे नेते अवधुत वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना, सामना आणि सामानाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘आजकाल सामना हे शिवसेनेचे मुखपत्र कमी व भाजपच्या नावाने शिमगा करणारी पत्रावळ जास्त वाटते. संजय राऊत माझे मित्र आहेत पण सध्या त्यांची मनस्थिती ठिक नाही असे वाटते.’
आजकाल #सामना हे शिवसेनेचे मुखपत्र कमी व भाजपाच्या नावाने शिमगा करणारी पत्रावळ जास्त वाटते.
संजय राऊत माझे मित्र आहेत पण सध्या त्यांची मनस्थिती ठिक नाही असे वाटते.— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) July 10, 2021
‘सामाना’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतरही सामनामध्ये भाजप विरोधी लिखान प्रसिद्ध झाले होते. त्यात आता केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करताना खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना डावलण्यात आल्यावर ‘सामना’ मधून भाजपवर टीका झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने देखील शिवसेनेवर पलटवार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नितीन गडकरींच्या खासदारकीवर पटोलेंचा आक्षेप, याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी
- ‘मागण्या मान्य होत नसतील तर राज्यात पुन्हा आंदोलन सुरू करणार’, संभाजीराजेंचा इशारा
- पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विंडीजची १८ धावांनी मात
- अभिनेत्री पूजा सावंतचे ‘हे’ काम पाहून अनेकांनी केले कौतुक
- सामना गमावला तरीही चर्चा भारताच्या ‘सुपरवुमन’ हरलीनची
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

