Share

झिंबाब्वेविरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर बांग्लादेश २३७ धावांनी आघाडीवर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हरारे स्पोर्ट्स क्लब येथे सुरु असलेल्या झिंबाब्वे आणि बांग्लादेश संघात कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या दिवसाअखेर बांग्लादेशचा संघ २३७ धावांनी आघाडीवर आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांग्लादेशने दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता ४५ धावा जोडल्या होत्या.

झिंबाब्वेच्या दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामन्यात बांग्लादेशने २३७ धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात बांग्लादेशने ४६८ धावांची मजल मारली. बांग्लादेशकडुन महमुदुल्लाहने २७८ चेंडुत १७ चौकार आणि १ षटकारासंह नाबाद १५० धावांची खेळी केली. झिंबाब्वेकडुन ब्लेसिंग मुझारबनीने सर्वाधीक ४ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात झिंबाब्वेचा पहिला डाव २७६ धावांत संपुष्टात आला. यासह बांग्लादेशला पहिल्या डावात १९२ धावांची भक्कम आघाडी मिळाली. झिंबाब्वेच्या पहिल्या डावात टाकुद्ज़्वानाशी कैतानोने ३११ चेंडुचा सामना करतान ९ चौकाराच्या मदतीने सर्वाधीक ८७ धावांची खेळी केली. बांग्लादेशकडुन या डावात मेहदी हसनने सर्वाधीक ५ गडी बाद केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांग्लादेशचे दोन्ही सलामीवीर इस्लाम-हसन २२ आणि २० धावांवर खेळत होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!