Share

पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विंडीजची १८ धावांनी मात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज दरम्यान पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेल्या १४५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला केवळ १२१ धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह पाच टी-२० सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने १-० अशी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने निर्धारीत २० षटकात ६ गडी गमावत १४५ धावांची मजल मारली. वेस्ट इंडिजकडुन अष्टपैलु आंद्रे रसेलने २८ चेंडुत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाकडुन जोश हेजलवुडने १२ धावा देत सर्वाधीक ३ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ केवळ १६ षटकांतच १२७ धावांवर बाद झाला. मिचेल मार्शने ऑस्ट्रेलियाकडुन ३१ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. वेस्ट इंडिजकडुन ओबेड मॅकॉयने २६ धावात सर्वाधीक ४ गडी बाद केले. त्यालाच सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मालिकेतील पुढील सामना आज १० जुलै रोजी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!